शिरुरमध्ये दै. प्रभात आयोजित ‘ऑटो झोन-2019’चा भव्य शुभारंभ

“ऑटो झोन-2019′: नामांकित कंपन्यांच्या कार्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी

शिरुर: प्रभात वृत्तसेवा – पुण्याच्या ग्रामीण भागात वाहन विक्री आणि उद्योगाला चालना मिळण्याच्या हेतूने, “पुण्याची ओळख’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दै. प्रभातच्या वतीने “ऑटो झोन-2019′ या कार्सच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 22 ते रविवार दि. 24 नोव्हेंबर अखेर हे प्रदर्शन शिरुर एसटी स्टॅंडजवळील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर सकाळी 9 सायंकाळी 7 या वेळांत होणार आहे. तरी नव्याने वाहन खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर “ऑटो झोन-2019’मध्ये एसयुव्ही अर्थात स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल्स आणि एलसीव्ही अर्थात लाईट कमर्शियल व्हेईकल्सचे विशेष दालन असणार आहे. होंडा कार्ससाठी डेक्कन होंडा, व्यावसायिक वाहनांसाठी महिंद्रा आणि महिंद्राचे वितरक उन्नती मोटर्स, टाटा मोटर्सचे वितरक बाफना ऑटोमोटिव्ह, प्रवासी कार्ससाठी टाटा मोटर्सचे वितरक रुद्र मोटर्स, टोयोटा कार्ससाठी के. कोठारी टोयोटा, ह्युंदाई कार्ससाठी कोठारी-ह्युंदाई, अशोक लेलॅंडसाठी माय वर्ल्ड, होंडा मोटरसायकलसाठी दिग्विजय होंडा, रॉयल एनफील्डचे वितरक चोपडा मोटर्स अशा बहुतांश नामांकित कंपन्यांचे वितरक सहभागी होणार आहेत. तसेच ग्राहकांना कार खरेदीबरोबरच विशेष ऑफर्स, “स्पॉट फायनान्स’साठी वित्तीय कंपन्यांचे प्रतिनिधी, ऍक्‍सेसरीजमधील सवलती अशा अनेक गोष्टींचा अंतर्भाव “ऑटो झोन-2019’मध्ये असेल.
तालुक्‍यासह जिल्ह्यातील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, नामांकित या प्रदर्शनास हजेरी लावणार असून ग्राहकांनी जास्तीतजास्त संख्येने या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. प्रभाततर्फे करण्यात आले आहे.

#Autozone2019 : टाटा योद्धा

मालवाहतुकीसाठीच्या वाहनांची भारतातील बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या नवीन वाहने उपलब्ध करीत आहेत. अधिक वाचा ….

#Autozone2019 : टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटा फॉर्च्युनर भारतामध्ये अधिक सधन वर्गात लोकप्रिय झाल्यानंतर या गाडीमध्ये कंपनीकडून वेळोवेळी सुधारणा करण्यात येतात. नुकतीच फॉर्च्युनर टीआरडी सिलेब्रेटरी एडिशन उपलब्ध करण्यात आली असून, या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिक वाचा ….

#Autozone2019 : टाटा नेक्‍सॉन

टाटा नेक्‍सॉन कार यशस्वी झाल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीने सुधारित आवृत्तीमध्ये बरीच वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये नेक्‍सॉन एक्‍सई, एक्‍सएम, एक्‍सटी, एक्‍सटी+, एक्‍सझेड आणि एक्‍सझेड+ ही मॉडेल्स उपलब्ध करण्यात आली आहेत. अधिक वाचा ….

#Autozone2019 : टाटा हॅरिअर

टाटा मोटर्सने बरेच संशोधन आणि विकास केल्यानंतर नवनव्या कार सादरीकरणाचा धडाका चालू ठेवला आहे. त्याचाच भाग म्हणून टाटा हॅरिअर सादर करण्यात आली असून एक्‍सई मॉडेल 12.69 लाख रुपयांपासून सुरू होते तर एक्‍सझेड मॉडेल 16.25 लाख रुपयांत पडते. अधिक वाचा ….

#Autozone2019 : भारतीय बाजारपेठेत ‘एसयूव्ही’चा बोलबाला

अलीकडच्या काळात एसयूव्ही मोटारीसाठी भारतीय बाजारपेठ पोषक बनली आहे. रस्ते कामातील सुधारणा, नव्या पिढीची मागणी आणि भारतीयांचे वाढते उत्पन्न या आधारावर एसयूव्ही मोटारींचा बोलबाला होत आहे. अधिक वाचा ….

#Autozone2019 : अशोक लेलॅंडचा पॉवर ‘पार्टनर’

अशोक लेलॅंड पार्टनरमधील 6 टायर वाहनामध्ये 26 टक्‍के अधिक पॉवर 118 बीएचपी मॅक्‍ससह उपलब्ध करण्यात आलेली आहे. जानेवारी 2017 मध्ये लॉंच केल्यापासून या प्रकारातील बरीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. अधिक वाचा ….

#Autozone2019 : हिरोची ‘डेस्टिनी 125’

भारतातील सर्वांत मोठी दुचाकी निर्माण करणारी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने 125 सीसी प्रकारच्या बाईकमध्ये पदार्पण केले असून हिरो डेस्टिनी ही ऑटोमॅटिक स्कूटर उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक वाचा ….

#Autozone2019 : महिंद्र एक्‍सयूव्ही 500

महिंद्र एक्‍सयूव्ही 500 मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर कंपनीने यामध्ये काही सुधारणा करून महिंद्रा एक्‍सयूव्ही 300 हे वाहन सादर केले. अधिक वाचा ….

#Autozone2019 : मजबूत आणि कार्यक्षम फोर्ड इन्डेव्हर

फोर्ड कंपनीच्या इन्डेव्हर या एसयूव्ही या मजबूत वाहन प्रकाराला भारतातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वाहनाची किंमत साधारणपणे 28.19 लाख ते 32.97 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. अधिक वाचा

#Autozone2019 : टाटा इंट्रा

मालवाहतुकीसाठी छोटी चारचाकी वाहने उपलब्ध करण्याचा सपाटा टाटा मोटर्सने चालूच ठेवला असून, या क्षेत्रातून टाटा मोटरच्या ताळेबंदात भरीव योगदान होत असल्याचे दिसून येते. अधिक वाचा

#AutoZone2019: महिंद्रा बोलेरो मॅक्‍सी ट्रक

ग्राहक वस्तू, दूध, फळे, भाजीपाला इ.च्या सोयीस्कर वाहतुकीसाठीची छोटी व्यावसायिक वाहने महिंद्रा कंपनी मोठ्या प्रमाणात सादर करीत आली आहे. अधिक वाचा

#Autozone2019 : एक परिपूर्ण एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा

भारतातील दूरचा प्रवास करणाऱ्या ग्राहकांना विचारात घेऊन ह्युंदाई कंपनीने रुबाबदार दिसणारी परिपूर्ण ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही उपलब्ध केल्यापासून या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अधिक वाचा

#Autozone2019 : टोयोटा इनोव्हा क्रिस्टा

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा हे भारतातील सर्वाधिक खपाचे मल्टिपर्पज व्हेईकल म्हणजे एमपीव्ही असून हे जीडी डिझेल व ड्युअल व्हीव्हीटी-1 पेट्रोल इंजिन प्रकारात उपलब्ध आहे. अधिक वाचा

#Autozone2019 : रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350

जगभरात एक पॉवरफुल आणि रुबाबदार मोटारसायकल म्हणून रॉयल इनफिल्डच्या गाड्यांची ख्याती आहे. गेल्या दशकात भारतातील तरुणांकडून या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्यामुळे रस्त्यावर ही गाडी अनेकदा दिसते. अधिक वाचा

#Autozone2019 : रेनॉल्ट डस्टर

रेनॉल्ट कंपनीने सादर केलेल्या डस्टर कारला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनीने या गाडीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर काही सुधारणा करून नवी रेनॉ डस्टर बाजारात उपलब्ध केली आहे. अधिक वाचा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.