मालवाहतुकीसाठीच्या वाहनांची भारतातील बाजारपेठ वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्या नवीन वाहने उपलब्ध करीत आहेत. लाईट कमर्शियल व्हेईकल प्रकारात टाटा मोटर्सने आता महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. या कंपनीने अगोदर सादर केलेल्या लाईट कमर्शियल व्हेईकलला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर या बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढविण्यासाठी पिकअप प्रकारातील योद्धा हे वाहन भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे. अपेक्षेप्रमाणे 2017 पासून टाटा योद्धाची मागणी वाढत चालली आहे.
देशभरातील व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या गरजा ध्यानात घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक त्या प्रकारातील वाहने उपलब्ध करण्यासाठी टाटा मोटर्सने संशोधन आणि विकास करणे चालूच ठेवले आहे. त्यातूनच टाटा योद्धा आकारास आलेला आहे. टाटा मोटर्सने याअगोदर उपलब्ध केलेल्या झेनॉनपेक्षा योद्धामध्ये बरीच नवीन वैशिष्ट्य उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये अधिक माल अधिक कार्यक्षमपणे वाहून नेण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
एलसीव्ही टाटा योद्धा 5 नव्या प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. 1 ते 1।। टन माल यातून वाहून नेला जाऊ शकतो तर इंजिनची क्षमता 85 हॉर्सपॉवरपर्यंत आहे. इंजिन 4 सिलिंडर 2956 सीसीचे असल्यामुळे अधिक माल सहज वाहून नेला जाऊ शकतो. पॉवर स्टेअरिंगमुळे चालकाचा वाहनावर मजबूत ताबा राहतो. पुढील सन्स्पेशन सहा स्प्रिंगचे तर मागील सन्स्पेशन उत्तम आहे. त्यामुळे मालवाहतुकीवेळी धक्के बसण्याचे प्रकार कमी होतात. अधिक क्षमतेचे इंजिन असल्यामुळे प्रसंगी प्रतितासाला 80 कि.मी.पर्यंत वेग वाढू शकतो. हे वाहन ग्राहकांना अधिक आकर्षक वाटावे याकरिता तीन वर्षांची आणि तीन लाख कि.मी.ची वॉरंटी उपलब्ध करण्यात आली आहे. हे वाहन मजबूत असण्याबरोबरच आकर्षक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर कॅबिन ऐसपैस असल्यामुळे चालकाला थकवा जाणवत नाही. या वाहनाची किंमतही उपयोगितेच्या तुलनेत माफक ठेवण्यात आलेली आहे.