अशोक लेलॅंड पार्टनरमधील 6 टायर वाहनामध्ये 26 टक्के अधिक पॉवर 118 बीएचपी मॅक्ससह उपलब्ध करण्यात आलेली आहे. जानेवारी 2017 मध्ये लॉंच केल्यापासून या प्रकारातील बरीच वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. याबरोबरच अशोक लेलॅंड पार्टनर 4 टायर प्रकारातील वाहनेही उत्तमरित्या विकले जात आहेत. यामध्ये बराच माल वाहून नेण्याची क्षमता आहे.
या ट्रकमध्ये व्हील बेससाठी पाच पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये 2820 मि.मी., 2850 मि.मी. 3320 मि.मी., 3350 मि.मी., 3955 मि.मी.चा समावेश आहे. हा ट्रक 3 लिटर झेडडी 30 डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे. इंजिन डीडीटीआय, डबल ओव्हर हेड कॅमसॅप्ट, कॉमन रेल, डायरेक्ट इंजेक्शन, टर्बो इंटरकुल्ड या यंत्रणाचा या इंजिनमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे या इंजिनची क्षमता वाढली आहे. यामध्ये पॉवर 118 बीएचपी इतकी उपलब्ध होते व 2750 आरपीएम मिळते. टॉर्क 3200 एनएम 1350-2600 आरपीएमसह मिळतो.
फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असल्यामुळे चाकांना ऊर्जा मिळते. समोर दुहेरी वापरात येणारे शॉकऑब्झॉर्व्हस् असून पाठीमागे सेमी इलिप्टिक शॉकऑब्झॉर्व्हस असल्यामुळे वाहनाच्या चालकाला किंवा आतील मालाला जास्त धक्के पोहोचत नाहीत. डिस्क ब्रेक असल्यामुळे वाहन योग्यवेळी फारसा त्रास न होता थांबवता येते.
पार्टनर 4 टायरची किंमत किफायतशीर आहे. हे वाहन 6020-6860 कि.ग्रॅ. इतक्या वजनाचे असून 3658-4305 किलो इतके वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. शेतीतील विविध उत्पादने, दुधाचे कॅन, वस्तू आणि पेय इ. वाहून नेण्यासाठी या वाहनाचा उपयोग केला जाऊ शकतो. हे वाहन दिसायला चांगले असून आरामदायक असल्यामुळे दूर प्रवास करूनही चालकाला फारसा ताण येत नाही.