भारतातील सर्वांत मोठी दुचाकी निर्माण करणारी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने 125 सीसी प्रकारच्या बाईकमध्ये पदार्पण केले असून हिरो डेस्टिनी ही ऑटोमॅटिक स्कूटर उपलब्ध करण्यात आली आहे. ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ही स्कूटर ड्युएट 125 म्हणून सादर करण्यात आली होती. मात्र, हे वाहन एकदम नवीन असल्यामुळे आता त्याचे नाव बदलण्यात आले आहे.
कुटुंबातील सर्वांना याचा दैनंदिन कामकाजासाठी वापर करता यावा अशा दृष्टिकोनातून हिरो डेस्टिनी 125 ही स्कूटर विकसित करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांना आपल्या पैशाचा पुरेपूर मोबदला या हीरो डेस्टिनी 125 मुळे मिळतो. त्याचबरोबर हिरो मोटोकॉर्प हे नाव या वाहनासी निगडीत असल्यामुळे विपणनासाठी कंपनीला चांगला लाभ होणार आहे. जयपूर येथील हिरोच्या संशोधन आणि विकास केंद्रामध्ये हे वाहन विकसित करण्यात आले आहे.
हिरो डेस्टिनी 125 फक्त स्टाईलिस्टच दिसत नाही तर यामध्ये विचारपूर्वक अनेक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, हिरो डेस्टिनी 125 सर्व्हिसिंग कधी करायची आहे याची आठवण करून देते. इंधन कधी भरावे लागणार आहे याचीही आठवण करून देण्यात येते. कंपनीने आपल्या संशोधन आणि विकास विभागामध्ये बरेच प्रयत्न करून ही वैशिष्ट्ये विकसित केली आहेत. हे वाहन एलएक्स आणि व्हीएक्स अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. एलएक्सची किंमत सर्वसाधारणपणे 54,650 रुपये तर व्हीएक्सची किंमत सर्वसाधारणपणे 57500 रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे. यामुळे सध्या 125 सीसी वाहनप्रकारात हिरो डेस्टिनी 125 सर्वाधिक किफायतशीर वाहन ठरत आहे. मात्र, या कंपनीला बऱ्याच मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. कारण या प्रकारात बऱ्याच कंपन्यांची वाहने उपलब्ध आहेत.