टाटा नेक्सॉन कार यशस्वी झाल्यानंतर टाटा मोटर्स कंपनीने सुधारित आवृत्तीमध्ये बरीच वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये नेक्सॉन एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सटी+, एक्सझेड आणि एक्सझेड+ ही मॉडेल्स उपलब्ध करण्यात आली आहेत. यामधील काही मॉडेलमध्ये ड्यूअल टोन रुफ असून ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.
यामध्ये विशेष नेक्सॉन केएआरझेड ट्रीम आवृत्ती सादर करण्यात आली आहे. यामधील वैशिष्ट्य जवळपास सारखेच आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही साधारणपणे 6,.58 लाख ते 11.1 लाखांत (दिल्ली एक्स शोरूम किंमत) पडते. यातील इंजिन 1.2 लिटर टर्बोचार्जड् पेट्रोल किंवा 1.5 लिटर टर्बोचार्जड् डिझल प्रकारातील आहेत.
पेट्रोल इंजिन 110 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क देते. तर डिझेल इंजिनसुद्धा 110 पीएस पॉवर देते. मात्र, याचा टॉर्क 260 एनएम आहे. या दोन्ही इंजिनात 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड एएमटी उपलब्ध आहे. नेक्सॉनमध्ये साडेसहा इंचाची टचस्क्रीन इम्फोटेनमेन्ट व्यवस्था उपलब्ध असून ती हार्मन-कारडॉनकडून घेण्यात आलेली आहे व 8 स्पिकरचे सेट आहेत. या कारमध्ये प्रोजेक्टर हेट लॅम्प आणि एलईडी डीअरएलएस उपलब्ध आहेत.
या एसयूव्हीच्या मागील बाजूस एसी व्हेंट्स असून मल्टिपल ड्राईव्ह मोड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. (इको, सिटी आणि स्पोर्ट) या कारमध्ये सुरक्षाविषयक पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये ड्युअल फ्रंट एअर बॅग्ज, इसोफिक्स चाईल्ड शीट, एबीएस हे ईबीडीसह उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कॉर्नर स्टॅबिलीटी कंट्रोल देण्यात आलेला आहे.