रेनॉल्ट कंपनीने सादर केलेल्या डस्टर कारला भारतातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनीने या गाडीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर काही सुधारणा करून नवी रेनॉ डस्टर बाजारात उपलब्ध केली आहे. या गाडीची भारतातील सर्वसाधारण किंमत 8 लाख ते 12.50 लाखांदरम्यान (एक्स शोरुम) आहे. रेनॉल्ट डस्टरच्या नव्या नऊ मॉडेल्सना ग्राहकाने उत्तम प्रतिसाद दिला आहे.
रेनॉल्ट डस्टरची नऊ मॉडेल सादर केले आहेत. त्यामध्ये पेट्रोल आरएक्सई, पेट्रोल आरएक्सएक्स, पेट्रोल आरएक्सएस सीव्हीटी, डिझेल 85 पीएस आरएक्सई, डिझेल 85 पीएस आरएक्सएस, डिझेल 110 पीएस आरएक्सएस, डिझेल 110 पीएस आरएक्सझेड, डिझेल 110 पीएस आरएक्सएस ऑप्शन एडब्ल्यूडी आणि डिझेल 110 पीएस आरएक्सझेड एएमटी या मॉडेलचा समावेश आहे.
रेनॉल्ट डस्टरचे इंजिन पेट्रोल आणि डिझेल स्वरुपात उपलब्ध आहे. रेनॉ डस्टरचे पेट्रोल इंजिन 1.5 लिटरचे असून 106 पीएस/142 एनएम पॉवर देते. हे इंजिन 5 स्पीड एमटी आणि सीव्हीटी प्रकारात आहे. डिझेल इंजिन ही 1.5 लिटर युनिटचे असून, ते दोन प्रकारात उपलब्ध आहेत. पहिल्या प्रकारातील इंजिनची क्षमता 85 पीएसव200एनएम आहे तर दुसऱ्याची क्षमता 110 पीएसव 245 एम आहे.
या प्रकारातील ही एकमेव एसयूव्ही असून गाडीमध्ये एडब्ल्यूडी म्हणजे ऑल व्हिल ड्राईव्हा सिस्टीम उपलब्ध करण्यात आली आहे. समोरच्या बाजूला दुहेरी एअरबॅग्ज असल्यामुळे सुरक्षितता वाढली आहे. मागच्या बाजूला सेन्सर्स असल्यामुळे पार्किंग करताना सुरक्षितता वाढते. त्याचबरोबर सीट बेल्टसाठी रिमाइंडर दिले जातात.
चालकाला गाडी संबंधातील विविध माहिती वेळोवेळी सहज दिसता यावी याकरिता 7 इंच टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट उपलब्ध करण्यात आले आहे. याला ऍन्ड्रॉईड ऑटो आणि ऍपल कार प्ले संलग्न असून 6 स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गाडीतील वातावरण बदलण्यासाठी ऑटो क्लायमेट कंट्रोल, प्रोजेक्टर हेड लॅम्प एलईडी टेल लॅम्पस उपलब्ध करण्यात आले आहेत.