Pakistan Cricket Board (इस्लामाबाद) – 2011 मध्ये भारताला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन आता पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक असतील. वास्तविक, टी-20 विश्वकरंडक जूनमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान बोर्डाने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज गॅरी कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून मोठा निर्णय घेतला आहे.
त्यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची पाकिस्तानी कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघांना दोन वर्षांचा करार देण्यात आला आहे. न्यूझीलंड मालिकेसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले अझहर महमूद सर्व फॉरमॅटमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) रविवारी ही माहिती दिली.
Gary Kirsten and Jason Gillespie bring with them a wealth of coaching experience.
Read more ➡️ https://t.co/2CWCTGDRVN pic.twitter.com/ISo6jGaBFw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 28, 2024
मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्र्यू पुटिक यांनीही अलीकडेच त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. एप्रिल 2023 मध्ये, मिकी आर्थर यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ब्रॅडबर्न यांची गेल्या वर्षीच्या सुरुवातीला संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू पुटिक हे एप्रिल 2023 पासून पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक होते.
वनडे विश्वकरंडकानंतर अनेक बदल…
आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक 2023 नंतर, पीसीबीने आपल्या सपोर्ट स्टाफमध्ये अनेक बदल केले आहेत. या विश्वकरंडकात पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता. त्यानंतर पीसीबीने शाहीन आफ्रिदीला टी-20 संघाचा कर्णधार बनवले. मात्र, गेल्या महिन्यात पीसीबीने पुन्हा बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवले आहे.