टोयोटा फॉर्च्युनर भारतामध्ये अधिक सधन वर्गात लोकप्रिय झाल्यानंतर या गाडीमध्ये कंपनीकडून वेळोवेळी सुधारणा करण्यात येतात. नुकतीच फॉर्च्युनर टीआरडी सिलेब्रेटरी एडिशन उपलब्ध करण्यात आली असून, या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. फॉर्च्युनरच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त टीआरडी लॉंच करण्यात आली. ही गाडी पेट्रोल आणि डिझल इंजिन प्रकारात उपलब्ध असून किंमत 27.83 लाख ते 33.85 लाख (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
फॉर्च्युनरचे इंजिन 2.8 लिटर 4 सिलिंडर टर्बोडिझेल प्रकारातील आहे. टॉर्क 420 एमएम आहेत. त्याचबरोबर 2.7 लिटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिनची पॉवर 166 पीएस व टॉर्क व 245 एनएम आहे. 5 स्पीड मॅन्युअर गिअर बॉक्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ऍटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे. पेट्रोल कार 2 डब्ल्यूडी मध्येच असून डिझेल कार 2 डब्ल्यूडी आणि 4 डब्ल्यूडी मध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. टोयोटा फॉर्च्युनर सात आसनी एसयूव्ही असून यामध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प तसेच एलईडी डीआरएल आहेत. ड्रायव्हरच्या सीटला ऍडजेस्ट करता येते. क्रुझ कंट्रोलचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
महाग परंतु अतिशय आरामदायक असलेल्या या गाडीमध्ये सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यात आली असून, 7 एअरबॅग्ज आहेत. त्यामुळे थोडीशी महाग गाडी खरेदी करण्याची क्षमता असलेल्यासाठी ही गाडी उत्तम आहे. त्यामुळे महानगरामध्ये या गाडीची मागणी जास्त आहे. विशेषतः जास्त अंतर प्रवासासाठी ही गाडी अधिक उपयोगी असल्याचे टोयोटा फॉर्च्युनर वापरणारे सांगतात.