भारतात गेल्या दहा वर्षांपासून सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी बरीच मागणी वाढली आहे. त्यामुळे भारतात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंपन्यांनी अशाप्रकारचे वाहन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकारातील डब्ल्यूआर-व्हीआणि बीआर-व्ही हे वाहन होंडा कंपनीने उपलब्ध केले आहे. यामुळे या बाजारपेठेतील मोठा हिस्सा आपल्याला मिळेल, असे होंडा कंपनीने म्हटले आहे.
होंडा डब्ल्यूआर-व्हीची भारतातील सुरुवातीची सर्वसाधारण किंमत 7.75 लाख (एक्स शोरुम, दिल्ली) आहे. जपानच्या या कंपनीचे होंडा डब्ल्यूआर-व्ही वाहन होंडा जाझ प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आले असून, यामध्ये होंडा सिटीची काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य उपलब्ध करण्यात आली आहेत. थोडक्यात, सध्याच्या जाझमध्ये काही रूपांतरण करून होंडा डब्ल्यूआर-व्ही विकसित करण्यात आली आहे.