ग्राहक वस्तू, दूध, फळे, भाजीपाला इ.च्या सोयीस्कर वाहतुकीसाठीची छोटी व्यावसायिक वाहने महिंद्रा कंपनी मोठ्या प्रमाणात सादर करीत आली आहे. ग्राहकांच्या विशिष्ट गरजा ध्यानात घेऊन, वेळोवेळी नवी वाहने सादर केली जातात. काही महिन्यांपूर्वी सादर केलेल्या महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस या व्यावसायिक वाहनालाही देशातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
अधिक अवघड वाहतूक सहज करता यावी याकरिता या वाहनात एम2डीआयसीआर हे इंजिन उपलब्ध करण्यात आले आहे. हे वाहन 1200 किलो वजन 17 कि.मी. प्रति लिटर क्षमतेने वाहून नेऊ शकते. यासाठी आवश्यक 16 हॉर्सपॉवर निर्माण करण्याची क्षमता या इंजिनमध्ये आहे. याचा व्हील बेस 3150 मि.मी.चा असल्यामुळे अधिक वजन असल्यानंतरही वाहन स्थिर राहण्यास मदत होते. समोरील भागातील सस्पेंशनमुळे अवघड रस्त्यावर वाहन चालविताना अडचण येत नाही. चेसिस बळकट असल्यामुळे वाहन दीर्घकाळ टिकते व देखभालीचा खर्च कमी येतो.
त्याचबरोबर फेरविक्रीवेळी चांगली किंमत मिळते. वाहनाची चोरी होऊ नये याकरिता इम्बोविलायझरची महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रकमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन मालकांना मानसिक ताणांना सामोरे जावे लागत नाही. कारगो डेक 40.6 वर्ग फुटाचा असल्यामुळे अधिक माल वाहून नेता येतो. या वाहनाच्या देखभालीचा खर्च अत्यल्प आहे. पॉवर स्टेअरिंगमुळे चालकाला वाहन आरामात चालवता व गरज पडल्यास थांबविता येते.
त्यामुळे महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रकच्या मालकास कमी वेळेत अधिक नफा मिळविण्याची शक्यता खुली होते. त्याचबरोबर जागा जास्त असल्यामुळे माल अधिक प्रमाणात ठेवता येतो. महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रकचे इंजिन 2.5 लिटर एम2डीसीआयआर टर्बो चार्जड् असून उत्सर्जनाचे बीएस-4 मानदंडाची पूर्तता करते. चाकांना ऊर्जा 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्सच्या माध्यमातून दिली जाते. महिंद्रा बोलेरो मॅक्सी ट्रकचा तासी वेग 115 कि.मी.पर्यंत वाढविता येतो.