भारतातील दूरचा प्रवास करणाऱ्या ग्राहकांना विचारात घेऊन ह्युंदाई कंपनीने रुबाबदार दिसणारी परिपूर्ण ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही उपलब्ध केल्यापासून या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या गाडीमध्ये डोळ्यात भरण्यासारखी वैशिष्ट्ये आहेत. एकतर ती रूबाबदार आणि स्पोर्टी ठेवण्यात कंपनीला यश मिळाले आहे. गाडीमध्ये उच्च तंत्रज्ञान आधारीत अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
त्याचबरोबर दणकट एसयूव्हीसाठी आवश्यक असे बळकट आणि अधिक पॉवरफूल इंजिन गाडीमध्ये असल्यामुळे दीर्घपल्ल्याचा प्रवास फारसा थकवा न येता होऊ शकतो. प्रवाशांसाठी गाडी अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी सुरक्षाविषय अनेक बाबी या गाडीमध्ये समाविष्ट केल्या आहेत. सध्याचे युग इंटरनेट ऑफ थिंग्जचे आहे. त्यामुळे गाडीतील विविध भाग परस्परांसी सुसंवाद साधतील. त्याचबरोबर चालकाचा मोबाइलद्वारे बाह्यजगताशी सुरळीत संपर्क राहील यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी या गाडीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
यासाठी कंपनीच्या विविध संशोधन आणि विकास केंद्रातील विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आलेला आहे. ही गाडी अधिक आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या प्रथमच स्मार्ट की बॅंड आहेत. त्याचबरोबर वायरलेस फोन चार्जर पुरविण्यात आला आहे. स्मार्ट इलेक्ट्रिक सनरुफमुळे ही गाडी आकर्षक आणि उपयोगी होणार आहे. या गाडीत प्रथमच 6 वे पॉवर ड्रायव्हर सीट उपलब्ध करण्यात आले आहे आणि ऑटोलिंक सुविधा आहे.
इंजिन 1.6 लिटर पेट्रोल आणि डिझेल असून, अशा वर्गातील हे सर्वात अधिक पॉवर देणारे इंजिन आहे. क्रूझ कंट्रोलमुळे चालकाला जास्त ताण होत नाही. इलेक्ट्रोक्रोमिक मिरर व ह्युंदाई आय ब्ल्यू ही आणखी वैशिष्ट्य सादर करण्यात आलेली आहेत. ग्राहकाला देखभालीकडे अधिक लक्ष देण्याची गरज पडू नये याकरिता तीन वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी देण्यात ह्युंदाईने पुढाकार घेतलेला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर गाडी बिघडल्यास दुरूस्त करण्यातही कंपनीचे डिलर पुढाकार घेतात.