महिंद्र एक्सयूव्ही 500 मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्यानंतर कंपनीने यामध्ये काही सुधारणा करून महिंद्रा एक्सयूव्ही 300 हे वाहन सादर केले. यालाही देशातील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळकत आहे. हे वाहन सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील असून, इतर अनेक कंपन्यांच्या या वाहनांशी एक्सयूव्ही 300 उत्तम स्पर्धा करीत आहे. हे वाहन 3990 मि.मी. लांब, 1820 मि.मी. रूंद आणि 1620 मि.मी. उंच आहे. व्हील बेस 2620 मि.मी. असून या प्रकारातील वाहनातील हा सर्वात मोठा व्हीलबेस आहे. शहरामध्ये खाचखळग्यात वाहन चालवताना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.
सांगयॉंग टीओली प्लॅटफॉर्मवर हे वाहन असून, 4 मीटर वाहनात समावेश व्हावा अशा पद्धतीने थोडे कमी केले आहे. हे वाहन चित्त्याच्या वैशिष्ट्यावर विकसित करण्यात आले असून, दिसण्यास तसेच आहे. त्याचबरोबर या वाहनामध्ये कारइतका आराम मिळेल यासाठी बरीच वैशिष्ट्ये सादर करण्यात आली आहे. समोरचा भाग आकर्षकरिता तयार करण्यात आलेल असून, एलईडी प्रोजेक्टर लॅम्प उपलब्ध आहेत. डीआरएल स्ट्रीपद्वारे फॉगलॅम्प व हेड लॅम्प जोडण्यात आलेले आहेत. टेल लॅम्प आकर्षक करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तरुणांना हे वाहन आकर्षक वाटत आहे. आधुनिक तरुणांना आकर्षित करण्यासाठी यामध्ये ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, फ्रंट पार्किंग सेन्सर उपलब्ध करण्यात आली आहेत. यामुळे पार्क करताना चालकाला त्रास कमी होतो. अशा वाहनात सहसा उपलब्ध नसलेल्या 7 एअरबॅग्ज यामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय इलेक्ट्रिक सनरुफ, क्रूझ कंट्रोल, एलईडी लॅम्प, 7 इंचाची टचस्क्रिन, स्मार्ट फोन कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वाहन मोबाइलशी कनेक्ट राहण्यात कसलेही अडथळे येत नाहीत. या वाहनासाठी 1.2 लिटर पेट्रोल व 1.5 डिझेल इंजिन उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये 6-स्पीड गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे. त्यामुळे चालकाला वाहनाचे नियंत्रण करणे सोपे जाते.