Lok Sabha Election 2024 । गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सर्वाधिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. अशात माढ्यातून रिंगणात असलेल्या भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे माढ्यामध्ये राजकीय चित्र पूर्णतः पालटून गेले आहे. मिळलेल्या माहितीनुसार,रणजीतसिंह निंबाळकर यांच्या निंबाळकरांच्या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केली आहे. या प्रचारसभेत सदाभाऊंनी शरद पवारांचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले,’बाप मुलगा कर्तबगार झाला की त्याच्या हातात प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतोय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवरांच्या लक्षात आले की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काढत नाही म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? म्हणून दादा विकासासाठी महायुतीमध्ये आले.’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
हे वाचले का ?
राज्यात कुठे किती झाले मतदान ? वाचा
अमरावती, वर्ध्यात EVM मशिनमध्ये बिघाड; मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा
‘संविधानाचे सैनिक बनून लोकशाहीचे रक्षण करा’ ; राहुल गांधींचे मतदारांना आवाहन
बिहारमधील लोकसभेच्या चार जागांवर मतदानाची वेळ बदलली
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क