Lok Sabha Elections 2024| लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी आज १३ राज्यांमधील ८८ जागांवर मतदान पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जात आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हे ते मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
याशिवाय कर्नाटकमधील १४, राजस्थानमधील १३, उत्तरप्रदेशातील ८, मध्यप्रदेशातील ६ मतदारसंघही मतदानासाठी सज्ज झाले आहेत. त्याशिवाय, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमधील प्रत्येकी ३ जागांवर मतदान होईल. मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी १ मतदारसंघ त्या प्रक्रियेला सामोरा जाईल.
#WATCH | Karnataka: Union Minister Nirmala Sitharaman along with her father, arrives at BES polling booth in Bengaluru to cast her vote in the Lok Sabha elections.
Karnataka is voting on 14 seats today in the second phase of Lok Sabha elections.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/WE4o0mM1jE
— ANI (@ANI) April 26, 2024
यादरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. बंगळुरूमध्ये त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील उपस्थित होते. नुकताच त्यांच्या मतदान केंद्रावर पोहचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्नाटकात आज 14 जागांसाठी मतदान होत आहे.
हेही वाचा: