Ravi Kishan । भोजपुरी आणि हिंदी सिनेसृष्टीतील स्टार रवी किशनला मुंबई न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. रवि किशनची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तरुणीची डीएनए चाचणीची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
25 वर्षीय शिनोवा या महिलेने दिवसापूर्वी आपण अभिनेता रवी किशन यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. त्यासाठी तिने न्यायालयाकडे डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. यासाठी तिने न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली.
डीएनए चाचणीची मागणी फेटाळली Ravi Kishan ।
या प्रकरणावर बोलताना शिनोवाने आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाली, ती रवि किशनची मुलगी आहे. तिला रवी किशनने त्याची डीएनए चाचणी करावी, जेणेकरून तो खोटे बोलत आहे की नाही हे सिद्ध होईल. मात्र, आता मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयाने शिनोवाची ही मागणी फेटाळून लावली आहे.
न्यायालयाने काय म्हटले ? Ravi Kishan ।
२५ वर्षीय शिनोवाने दावा केला होता की, रवी किशन हे तिचे जैविक पिता आहेत. न्यायालयाने म्हटले की, “रवी किशन आणि शिनोवाची आई असल्याचा दावा करणारी महिला यांच्यात कोणतेही कौटुंबिक संबंध नव्हते, त्यामुळे कोणताही खटला चालवला गेला नाही. दरम्यान, न्यायालयाचा पूर्ण आदेश अद्याप जारी झालेला नाही.
दरम्यान, अपर्णा ठाकूर यांच्या दाव्यानंतर रवी किशनची पत्नी प्रीती किशनने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. अनेक गंभीर आरोप केले होते. अपर्णा अनेक दिवसांपासून त्या लोकांना त्रास देत असून 20 कोटी रुपयांची मागणी करत आहे, असे त्यांनी म्हटले होते. ही मागणी पूर्ण न केल्यावर अपर्णाने रवी किशनवर आरोप केले आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
हेही वाचा
कौतुकास्पद ! अभिनेता रवी किशन यांची लेक 21 व्या वर्षी होणार सैन्यात भरती