खालापूर (वार्ताहर) – खालापुर न्यायालय व विधी सेवा खालापूर यांच्या संयुक्त माध्यमातून खालापुर न्यायालयात 3 मे रोजी कायदेविषयक शिबिर पार पडले. यावेळी अनेकांनी कायदेविषयक मत मांडत कायदेविषयक जनजागृती केल्याने खालापुर न्यायालय व विधी सेवा खालापूर यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
खालापुर न्यायालयात झालेल्या कायदेविषयक शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश बाभले, सहन्यायाधीश माने, खालापूर युवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सचिन चाळके यावेळी ॲड.विकास म्हात्रे, ॲड.पद्मा पाटील, ॲड.रामदास पाटील, ॲड.शैलेश पालांडे, ॲड.मिलिंद सुरावकर, ॲड.पंचशीला विटे आदी वरिष्ठ वकिलांनी हजेरी लावत उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिरात फौजदारी कायदेविषयक ॲड.सत्यवान वाडेकर यांनी सखोल मार्गदर्शन करीत आरोपीला असलेले अधिकार, आरोपीला स्वतःच्या बचावा करता वकील देण्याचा अधिकार, जामीन देण्याचा अधिकार असे विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार खालापूर युवा बारा असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सचिन चाळके यांनी केले.