IPL 2024 ( MI vs SRH Match 55, Live Cricket Score ) : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 55 क्रमांकाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला आहे.
या विजयासह मुंबई गुणतालिकेत दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर पोहोचली आहे. आता संघाच्या खात्यात आठ गुण आहेत. त्याच वेळी, निव्वळ रन रेट -0.212 झाला आहे. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद 12 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
मुंबईने विजयासाठी मिळालेलं 174 धावांचं आव्हान हे 17.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्याने वानखेडे स्टेडियममध्ये विजयी षटकार ठोकत शतक पूर्ण केलं. सूर्याचं हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरं शतक ठरलं.सूर्यकुमारने शतकासाठी आणि मुंबईच्या विजयासाठी 6 धावांची गरज असताना षटकार ठोकला. सूर्याने या षटकारासह शतकही पूर्ण केलं आणि मुंबईला शानदार विजयही मिळवून दिला.
मुंबईसाठी सूर्याने 51 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. त्याने 12 चौकार आणि 6 षटकार मारले. तिलक वर्माने 32 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 143 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. त्याआधी रोहित शर्मा 4 धावा करून बाद झाला. इशान किशन 9 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर नमन धीर शून्यावर बाद झाला.
भुवनेश्वर कुमार, पॅट कमिन्स आणि मार्को जॉन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अवघ्या 3 षटकांत 45 धावा देत मार्को जॉन्सन चांगलाच महागडा ठरला. टी नटराजन, शाहबाज अहमद आणि नितीश रेड्डी यांनी चांगली गोलंदाजी केली, पण त्यांना एकही विकेट घेता आली नाही.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 8 विकेट गमावत 173 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी झाली. बुमराहने हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने अभिषेकला बाद केले. त्याला केवळ 11 धावा करता आल्या.
Innings Break!
Wickets in the middle overs restrict #SRH to 173/8 🎯#MI begin their chase next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/7Q2UUHiq9z
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
हैदराबादला दुसरा धक्का मयंक अग्रवालच्या रूपाने बसला. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर पियुष चावलाने हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवत तिसरा धक्का दिला. सलामीवीर हेडनं सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. या सामन्यात नितीशला 20, क्लासेनला दोन, जॅनसेनला 17, शाहबाजला 10, अब्दुलला तीन धावा करता आल्या. तर कमिन्स 35 धावा करून तर सनवीर आठ धावा करून नाबाद राहिला.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पांड्याने 4 षटकात 31 तर चावलाने 4 षटकात 33 धावा दिल्या. तर अंशुल कंबोज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक यश मिळाले. नुवान तुषारा याने 4 षटकात सर्वाधिक 42 धावा दिल्या. तुषाराला एकही विकेट घेता आली नाही.