IPPB Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ने 3 वर्षांच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर माहिती तंत्रज्ञान एक्झिक्युटिव्हच्या 54 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदे आणि अर्जाची तारीख –
माहिती तंत्रज्ञान कार्यकारी पदाच्या 54 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 मे 2024 पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता –
ज्या उमेदवारांनी संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये BE/B.Tech पदवी किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (MCA) किंवा BCA/B.Sc पदवी पूर्ण केलेली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदवी असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
मुलाखतीच्या आधारे निवड –
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. तथापि, बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. या भरतीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
असा करा अर्ज –
– सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ippbonline.com वर जा
– त्यानंतर होम पेजवर जा आणि करिअर बटणावर क्लिक करा.
– त्यानंतर ‘Apply Online Button’ वर क्लिक करा.
– आता नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
– यानंतर सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरण्यास सुरुवात करा.
– आता सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करा.
– भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.