Lok Sabha Election 2024 । देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 88 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यासोबतच बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघातील उर्वरित भागातही मतदान होत आहे.
आज केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1 जागांसाठी मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन्ही लोकसभा जागांवर होत आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या 4 जागांसाठी मतदानाची वेळ बदलण्यात आली आहे. प्रचंड उष्णतेची लाट पाहता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, बांका, मधेपुरा, खगरिया आणि मुंगेरमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होईल आणि ते संध्याकाळी ६ ऐवजी ७ वाजेपर्यंत चालेल. म्हणजे 12 तास मतदान करता येईल. प्रचंड उकाडा लक्षात घेता मतदानाची वेळ एक तासाने वाढवण्यात आली आहे.
हे वाचले का ?
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील लढतीकडे विशेष लक्ष ; ८ मतदारसंघात होणार रंजक लढत
‘घरी बसू नका, घराबाहेर पडा आणि मतदान करा’ – सुधा मूर्ती
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात; निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क