IPL 2024 ( MI vs SRH Match 55, Live Cricket Score ) : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 55 क्रमांकाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 8 विकेट गमावत 173 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला विजयासाठी 174 धावा कराव्या लागतील.
Innings Break!
Wickets in the middle overs restrict #SRH to 173/8 🎯#MI begin their chase next ⏳
Scorecard ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/7Q2UUHiq9z
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी चांगली सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी झाली. बुमराहने हैदराबादला पहिला धक्का दिला. त्याने अभिषेकला बाद केले. त्याला केवळ 11 धावा करता आल्या. हैदराबादला दुसरा धक्का मयंक अग्रवालच्या रूपाने बसला. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर पियुष चावलाने हेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवत तिसरा धक्का दिला. सलामीवीर हेडनं सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. या सामन्यात नितीशला 20, क्लासेनला दोन, जॅनसेनला 17, शाहबाजला 10, अब्दुलला तीन धावा करता आल्या. तर कमिन्स 35 धावा करून तर सनवीर आठ धावा करून नाबाद राहिला.
मुंबईकडून हार्दिक पांड्या आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. पांड्याने 4 षटकात 31 तर चावलाने 4 षटकात 33 धावा दिल्या. तर अंशुल कंबोज आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी एक यश मिळाले. नुवान तुषारा याने 4 षटकात सर्वाधिक 42 धावा दिल्या. तुषाराला एकही विकेट घेता आली नाही.
T20 World Cup 2024 : पाच विदेशी संघांत तब्बल 22 खेळाडू भारतीय वंशाचे, ‘या’ संघात सर्वाधिक 8 खेळाडू….
दरम्यान, हैदराबाद संघ 10 सामन्यांत सहा विजय आणि चार पराभवांसह (12 गुण) गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्स 11 सामन्यांतून केवळ तीन विजयांसह (6 गुण) गुणतालिकेत तळावर आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघांच्या नजरा विजयाकडे असतील.