ठाणे- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस उरले असून शासकीय यंत्रणा देखील वेगवेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती कार्यक्रम घेत आहे. यामुळे ऐकून घेऊ सर्वांचे…एक मत देऊ जबाबदारीचे…! असे घोषवाक्य म्हणत महिला बचत गटांनी ठाणे लोकसभा क्षेत्रात नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती सुरु झाली आहे.
ठाणे लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथक कडून नुकतेच महिला बचत गटांमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर ठाणे शहरात २५ ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत १४८ -ठाणे विधानसभा मतदार संघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची टक्केवारी व मतदान जनजागृती करण्यासाठी शनिवारी रोजी महिला बचतगटाच्या माध्यमातून बचतगटातील महिला सदस्यांचा मतदान जनजागृती कार्यक्रम दादा पाटीलवाडी, ठाणे येथे आयोजित केला होता.
सदर मतदान जनजगृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या बचतगटातील महिलावर्गाला मी मतदान करणारंच… आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.
सदर मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी प्रतिमा महालक्ष्मी, इच्छापूर्ती, वैभवलक्ष्मी, अनमोल आणि नर्मदा या सर्व बचतगतील महिला उपस्थित होत्या त्या सर्व महिलांनी ऐकून घेऊ सर्वांचे…एक मत देऊ जबाबदारीचे… असा संदेश देत सर्व नागरिकांना २० मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले.