इंदोरी (वार्ताहर) – ग्रामदैवत कडजाई मातेचा वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीत १५६ बैलगाडे सहभागी झाले होते. फायनल प्रथम क्रमांक व घाटाचा राजा असा दुहेरी मुकुटाचा मानकरी सोमाटणे (मावळ) येथील कांचन मुऱ्हे यांचा बैलगाडा ठरला.
उत्सवाच्या दिवशी पहाटे काकड आरती, महापूजा, अभिषेक, पालखी छबिना मिरवणूक व ग्रामप्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर ऑर्केस्ट्रा तसेच डीजे शो हे करमणुकीचे कार्यक्रम पार पडले.
बैलगाडा शर्यतीतील अनुक्रमे एक ते सात विजयी बैलगाड्यांना रोख रक्कम व दुचाकी, फ्रीज, एलसीडी, असे बक्षीसांचे वाटप करण्यात आले. तसेच घाटाचा राजासाठीही दुचाकी बक्षीस दिले गेले.