Amruta Khanvilkar And Sanjay Leela Bhansal| सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हिरामंडी’ ही वेबसिरिज सध्या चर्चेत आहे. नुकताच या वेब सीरिजचा प्रीमियर सोहळा काल मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी अनेक सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेत्री अमृता खानविलकर देखील यावेळी उपस्थित राहिली होती. यानंतर तिने संजय लीला भन्साळी यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
काही दिवसापूर्वी झालेल्या मुलाखतीमध्ये अमृताने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता तिने हिरामंडी या वेब सीरिजच्या प्रीमियर सोहळ्यातील संजय भन्साळी यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडिया शेअर केला आहे. Amruta Khanvilkar And Sanjay Leela Bhansal|
सोबत अमृताने कॅप्शनमध्ये लिहिले की, “About last night One And Only संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडीच्या प्रीमियरमध्ये हजेरी लावली, असे अनुभव तुमचे सर्व प्रयत्न सार्थकी लावतात, तुम्हाला शुभेच्छा सर. महेश लिमये तुम्ही खरे जादूगार आहात आणि तुम्ही कॅमेरासोबत जे करता ते एखाद्या चित्र सारखे आहे. आशिष पाटील, क्रेडिट लिस्टमध्ये तुझे नाव पाहणे ही अभिमानाची गोष्ट आहे.” अमृता लवकरच झाकीर खानसोबत एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. Amruta Khanvilkar And Sanjay Leela Bhansal|
View this post on Instagram
दरम्यान, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे भन्साळी त्यांच्या ‘ग्रँड’ स्टाइलसाठी ओळखले जातात. मोठमोठे सेट आणि भव्य डिझाईन त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. चित्रपटाचे संगीत असो की संवाद, प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम करण्यासाठी ते ओळखले जातात. या नव्या वेबसिरिजमध्ये देखील त्यांची खासियात पाहायला मिळत आहे.
संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा: