मुंबई -राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होईल. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. (Lok Sabha Third Phase Voting of maharashtra on 11 seats)
तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य २ कोटींहून अधिक मतदार ठरवतील. पहिल्या २ टप्प्यांत मिळून राज्यातील १३ जागांसाठी मतदान झाले. राज्यातील मतदान प्रक्रिया ५ टप्प्यांत होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे यादिवशी ११ जागांसाठी, तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यात २० मे यादिवशी १३ जागांसाठी मतदान .