भूलथापा देणाऱ्या उमेदवारांना जनता जागा दाखवेल : फुंदे

पाथर्डी – मागील पाच वर्षात पंकजाताई यांनी दिलेल्या आमदार मोनिका राजळे यांना निवडुन दिल्यामुळे भरीव कामे मतदारसंघामध्ये झाली. रस्त्यांबरोबरच, जलसंधारणाची कामे या भागामध्ये झाली असुन यापुढे आश्वासन देणाऱ्या उमेदवारांना निवडुन न देता, भाजप आणि पंकजाताई यांनी विश्वास ठेवलेल्या उमेदवारांनाच आपण निवडुन देण्याचे काम करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते भिमराव फुंदे यांनी टाकळीमानुर येथे प्रचार सभेत व्यक्त केले.

तालुक्‍यातील राजकाराणात पूर्वी मी राष्ट्रवादी पक्षाकडुन पंचायत निवडणुक लढविली असतांना भालगाव आणि टाकळीमानुर गणमध्ये पडलो. त्यावेळी मला कळले की राष्ट्रवादीचे इथे काय आहे, हा भाग भाजप आणि ना. पंकजा मुंडे यांच्या मागे किती खंबीर पणे उभा आहे. समोरचे उमेदवार जाती पातीचे विष या मतदारसंघात पसरवत आहेत.

परंतु त्यांना माझ्यामुळेच जिल्हा परिषद मिळाली असल्याचे त्यांनी विसरुन चालणार नाही, वीस वर्षापासुन राजकारण करीत आहेत. जात दिसली नाही आणि कामेही करता आली नाहीत, पंकजाताई यांच्या नेतृत्व मान्य करणारा समाज कमळ चिन्हापासुन दुर झाले नाही. त्यामुळे जातीचे राजकारण करणाऱ्यांना या भागामध्ये अनेकवेळा धडा शिकवला. देशात भाजपचे सरकार आहे. राज्यातही भाजप सेना युतीचे सरकार येणारा आहे. त्यामुळे पंकजाताई यांनी दिलेला उमेदवार आ. राजळे यांच्यामागे उभे राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सेनेचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब ढाकणे यांनी भाजप आणि पंकजाताई मुंडे यांना मानणारा हा मतदार संघ असुन काही लोकांकडुन ते पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु धनुष्यबाण तुमच्या साथीला असल्याने अशा सर्वांना मतदारांकडुन जागा दाखवण्याचे काम केले जाईल.

यावेळी वंदनाताई किसवे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, पांडुरंग खेडकर, आरपीआय तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु, शिवाजीराव मोहीते, वसंतराव पवार, नारायणराव पालवे, टाकळीमानुरचे उपसरपंच शुभम गाडे, भगवानराव आव्हाड, पोपटराव शिरसाठ, प्रशांत मंडलेचा, मुरली ठोंबरे, शेषराव ढाकणे, पिरा शिरसाठ, विजय जोशी, रहेमान शेख, दिलीप शहाणे, बी. एन. खेडकर, कृष्णा गाडे, आण्णासाहेब मनचरे, शिवदास तांबे, भाऊसाहेब फुलमाळी आदि उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)