Live score of GT vs RCB, IPL 2024 match 45 : आयपीएल 2024 चा 45 वा सामना रविवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात विराट कोहली आणि विल जॅकच्या स्फोटक भागीदारीमुळे आरसीबीने गुजरातचा नऊ विकेट्सने पराभव केला. गुजरातने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरू संघाने अवघ्या 16 षटकांत 1 गडी गमावून 206 धावा करत सामना जिंकला. या विजयासह आरसीबीच्या खात्यात सहा गुण जमा झाले आहेत. मात्र तरीही संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर गुजरात आठ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
Here is your 16th over update. 😮💨
We managed to keep the CRR above the RRR for the whole innings and topped it off with a Willy J blinder 🙇♂️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #GTvRCB pic.twitter.com/TX60p6YZsg
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 28, 2024
201 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या टॉप ऑर्डरने स्फोटक कामगिरी केली. सलामीला फलंदाजीला आलेल्या फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्यात 40 धावांची भागीदारी झाली. गुजरातसाठी साई किशोरने पहिली आणि एकमेव विकेट घेतली. या सामन्यात कर्णधार 12 चेंडूत 24 धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विल जॅकने गुजरातविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत संघाला विजयापर्यंत नेले.
आरसीबीचा दमदार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने या मोसमातील चौथे अर्धशतक 32 चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने 44 चेंडूत 70 धावांची नाबाद खेळी केली. गुजरातविरुद्ध किंग कोहलीने 159.09 च्या स्ट्राईक रेटने सहा चौकार आणि तीन षटकार मारले. यासह विराट कोहलीने आयपीएल 2024 मध्ये 500 धावा पूर्ण केल्या.
त्याचवेळी विल जॅकनेही आरसीबीसाठी या सामन्यात स्फोटक कामगिरी केली. त्याने अवघ्या 41 चेंडूत शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. या कालावधीत त्याने 243.90 च्या स्ट्राइक रेटने 5 चौकार आणि 10 षटकार ठोकले. त्याच्या खेळीमुळे आरसीबीने 16 षटकांत एक गडी गमावून 206 धावा केल्या आणि सामना नऊ गडी राखून जिंकला.
आजच्या सामन्यात अजमतुल्ला उमरझाई व्यतिरिक्त, गुजरात टायटन्सचा असा एकही गोलंदाज नाही ज्याने 10 पेक्षा कमी इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. गुजरातकडून साई किशोरने 3 षटकांत 30 धावा देत एकमेव विकेट घेतली. तर राशिद खानने 4 षटकात 51 धावा देत गोलंदाजीत आपले अर्धशतक पूर्ण केले. मोहित शर्मा आणि नूर अहमद यांचीही जोरदार धुलाई करण्यात आली. मोहितने 2 षटकात 41 तर अमहदने 4 षटकात 43 धावा दिल्या.
IPL 2024 (GT vs RCB Match 45) : सुदर्शनची दमदार कामगिरी; गुजरातचे आरसीबीसमोर 201 धावांचे लक्ष्य…
तत्पूर्वी, आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्सने 20 षटकांत तीन गडी गमावून 200 धावा केल्या. या सामन्यात साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली.
सलामीला फलंदाजीला आलेला रिद्धिमान साहा केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्वप्नील सिंगने बाद केले. तर कर्णधार गिल 16 धावा करू शकला. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केले. तिसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांच्यात 86 धावांची भागीदारी झाली जी सिराजने मोडली. 15 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या वेगवान गोलंदाजाने शाहरुखला बाद केले. तो 30 चेंडूत 193 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा करून परतला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि पाच षटकार आले. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 24 चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले.
त्याचबरोबर सुदर्शनही मागे राहिला नाही. या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने 34 चेंडूंची मदत घेतली. सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी 69 धावांची नाबाद भागीदारी केली. सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि चार षटकार आले. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने 19 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या.
आरसीबीकडून गोलंदाजी करताना स्वप्नील सिंगने 3 षटकात 23 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. मोहम्मद सिराजने 4 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला. मॅक्सवेललाही एक यश मिळाले. त्यानं 3 षटकात 28 धावा दिल्या.