आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे : प्रशांत पाटील

नगर – विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 21 ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. सदर मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर विविध यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने त्यांना दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी आज केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मतदानाच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार पुढे ढकलणे, मतदान केंद्र परिसरात कोणताही गोंधळ अथवा गडबड होणार नाही यासाठी उपाययोजना करणे, मतदान केंद्र परिसरात शासकीय वाहनाव्यतिरिकत्‌ अन्य वाहनांना प्रवेश न देणे, मतदानाआधी अठ्ठेचाळीस तास रेडीओ, स्थानिक केबलवरुन प्रचाराची जाहिरात प्रसारीत न करणे, या कालावधीत ध्वनीक्षेपकासाठी परवानगी न देणे, स्थानिक मतदार यादीत नसतील अशा स्टार प्रचारकांना मतदारसंघात थांबण्यास मनाई करणे आदी उपाययोजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याबाबत बैठकीत सूचित करण्यात आले.

बैठकीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.घोडके, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.