अयोध्या प्रकरण: न्यायालय जो निकाल देईल, तो आपल्याला मान्य

मुस्लिम पक्षकार इक्‍बाल अन्सारी यांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या अयोध्या प्रकरणावरील युक्‍तीवाद पुर्ण झाला आहे. दरम्यान, आता या युक्‍तीवादावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यात जो निर्णय देईल. तो आपल्याला मान्य असेल. त्याला परत आव्हान देणार नसल्याचे या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी यांनी म्हटले आहे.

न्यायालय जो निकाल देईल, तो आपल्याला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेले हे प्रकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे, याचा मला आनंद होतो आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले. अयोध्येतील बाबरी मशिद प्रकरणात इकबाल अन्सारी यांचे वडील हाशिम अन्सारी हे सर्वांत जुने वादी होते. इकबाल अन्सारी म्हणाले, गेल्या वर्षांपासून अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून राजकारण होते आहे. पण आता निकालानंतर या शहराचा विकास होईल, अशी मला आशा आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या कायदेशीर लढाईला अंतिम रूप देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, जुलै मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले. आधी ते शिलाई काम करायचे नंतर त्यांनी सायकल दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात केली. पासून ते बाबरी मशिद प्रकरणाशी जवळून संबंधित होते. मशिदीमध्ये रामाची मूर्ती स्थापित केल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले म्हणून त्यांना अटकही करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.