Poonam Mahajan Tweet | भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना तिकीट नाकारत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना संधी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा येथे उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्या लढत होणार आहे. मात्र भाजपने पूनम महाजन यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.
पूनम यांचं ट्विट Poonam Mahajan Tweet |
“खासदारकीच्या रुपाने गेल्या 10 वर्षात मुंबई उत्तर मध्य लोकसभेचे नेतृत्व करण्याची संधी मला दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देते. मला खासदार म्हणून नाही, तर मुलीप्रमाणे स्नेह दिला. मी माझ्या लोकसभा क्षेत्रातील कुटुंबियांची, जनतेची नेहमी ऋणी राहिल आणि आशा करते की, आपलं नातं कायम टिकून राहिलं. माझे दैवत, माझे वडील दिवंगत प्रमोद महाजन जी यांनी मला ‘राष्ट्र प्रथम’ हा मार्ग दाखवला, तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा,अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव या देशाच्या सेवेसाठी समर्पित राहील,” असं पूनम महाजन यांनी म्हटले आहे.
10 वर्षों तक एक सांसद के रूप में मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्र की सेवा का मौक़ा देने के लिए @BJP4India और प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का धन्यवाद।
मुझे एक सांसद ही नहीं बल्कि एक बेटी की तरह भी स्नेह देने के लिए मैं क्षेत्र की परिवार समान जनता की सदैव ऋणी रहूँगी, और यही…
— Poonam Mahajan (मोदी का परिवार) (@poonam_mahajan) April 27, 2024
दरम्यान, उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी विलेपार्ले येथील भाजपचं कार्यालय गाठलं. यावेळी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत उज्ज्वल निकम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
कोण आहेत उज्ज्व निकम ? Poonam Mahajan Tweet |
उज्ज्वल निकम हे देशातील सर्वात प्रसिद्ध सरकारी वकिलांपैकी एक आहेत. त्यांनी मुंबईवर 26/11 चा अतिरेकी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबसह 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गुलशन कुमार हत्याकांड व प्रमोद महाजन हत्याकांडासारखे अनेक हायप्रोफाईल खटल्यांत सरकारतर्फे यशस्वी युक्तिवाद केला आहे.
हेही वाचा:
संजय राऊत यांचा दावा; म्हणाले, ‘उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…’