कर्जत-जामखेडमध्ये पालकमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

कर्जत – येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे मतदारसंघातील कर्जत-जामखेडमधील कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बडे नेते भाजपच्या गळाला लावण्याची व्यूहरचना आखली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वत्र मोठी गळती लागलेली असून ती रोखण्यात पक्षाला यश येताना दिसत नाही.

कर्जत व जामखेड तालुक्‍यातही त्याचे मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. कर्जतला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद देऊनही पक्षातील मरगळ दूर होताना दिसत नाही. या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवत पालकमंत्री मास्टरस्ट्रोक मारत विरोधकांना धक्का देणार असल्याचे दिसत आहे.

कर्जतमधून राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्‍चित झाला असून त्यांना फक्त मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच काही पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश करून घेण्याची रणनीती आखली जात आहे. जामखेडमधूनही पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग होण्याची शक्‍यता आहे. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचा भाजपाला सोडून उमेदवारी करण्याचा निर्णय झाल्यास कॉंग्रेसमधूनही इनकमिंग होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले हेही पालकमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. राऊत हे भाजपातून बाहेर पडल्यास घुले यांचे इनकमिंग निश्‍चित मानले जात आहे. त्याचबरोबर विखे समर्थक अंबादास पिसाळ, ऍड. कैलास शेवाळे, अंकुशराव यादव, दादासाहेब सोनमाळी, डॉ. संदीप बरबडे, श्रीहर्ष शेवाळे हेही पालकमंत्र्यांसाठी सक्रिय होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)