Archery World Cup 2024 (Shanghai) – भारतीय पुरुष रिकर्व्ह संघ धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी रविवारी गत ऑलिम्पिक चॅम्पियन दक्षिण कोरियाचा पराभव करत 14 वर्षांनंतर तिरंदाजी विश्वकरंडक स्पर्धेत ऐतिहासिक विजय संपादन केला.
भारतीय पुरुष रिकर्व्ह संघाचा विश्वकरंडक फायनलमधील हा पहिला विजय आहे, ज्यामुळे आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या संधी वाढणार आहेत. धीरज, तरुणदीप आणि प्रवीण या त्रिकुटाने उत्तम संयम दाखवला आणि एकही सेट न गमावता बलाढय़ कोरियन खेळाडूंना बरोबरीत रोखले. त्यानंतर राहुल बॅनर्जी, तरुणदीप आणि जयंत यांच्या रिकर्व्ह संघाने जपानचा पराभव केला होता. स्पर्धेतील अव्वल दोन मानांकित संघांमधील सामन्यात भारताने 5-1 (57-57, 57-55, 55-53) असा विजय मिळवला. चालू विश्वकरंडकात भारताचे हे पाचवे सुवर्णपदक आहे.
HISTORY REPEATED!
The #TOPS Athlete trio of Tarundeep Rai, Dhiraj Bommadevara and Pravin Jadhav become part of history as the Indian Recurve team defeats Korean Recurve Team 🏹 after 1️⃣4️⃣ years ⏳
The South Koreans are formidable in this event, having won 6 out of a possible 9… pic.twitter.com/uKPMLOpEtm
— SAI Media (@Media_SAI) April 28, 2024
भारतीय त्रिकुटाने संयम दाखवला आणि सुरुवातीच्या सेटमध्ये तीन वेळा 10 गुण मिळवत कोरियाच्या आघाडीची बरोबरी केली. या सेटमध्ये दोन्ही संघांनी 57-57 गुण मिळवले. भारताच्या चमकदार खेळामुळे कोरियन संघ दडपणाखाली आला आणि त्याच्या तिरंदाजांनी आठ गुणांचे लक्ष्य दोनदा गाठले. याउलट, भारतीयांनी सहा बाणांमधून तीन एक्ससह 10 गुणांचे चार लक्ष्य केले आणि दुसरा सेट 57-55 असा जिंकून 3-1 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या सेटमध्ये कोरियाची कामगिरी आणखी घसरली आणि संघ केवळ 53 गुण मिळवू शकला. भारतीय तिरंदाजांनी संयमाने खेळून 55 गुण मिळवले आणि 2010 नंतर प्रथमच पुरुष संघाचे विजेतेपद पटकावले.
अंकिता-धीरजला कांस्य; दीपिकाला रौप्य
या नेत्रदीपक यशानंतर अंकिता भकट आणि धीरज यांच्या रिकर्व्ह मिश्र संघानेही कांस्यपदक जिंकून भारतीय संघाच्या आनंदात भर घातली. भारतीय जोडीने मेक्सिकोच्या अलेजांड्रा व्हॅलेन्सिया आणि मॅटियास ग्रांडे या जोडीचा 6-0 (35-31, 38-35, 39-37) पराभव केला. आई झाल्यानंतर खेळापासून दूर असलेल्या अनुभवी दीपिका कुमारीला महिलांच्या रिकर्व्हच्या वैयक्तिक अंतिम फेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिकाला लिम सिह्योनकडून सरळ सेटमध्ये 6-0 (26-27, 27-29, 27-28) असा पराभव पत्करावा लागला.
INDW vs BANW 1ST T20I : टीम इंडियाची दमदार कामगिरी, बांगलादेशचा 44 धावांनी केला पराभव…
भारताला पाच सुवर्णांसह आठ पदके
या जागतिक स्पर्धेत भारताने आठ पदके (पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य) जिंकली. पुरुष संघाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना कोरियन संघाशी झाला, ज्यातील दोन खेळाडू टोकियो ऑलिम्पिकच्या सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य होते. सुवर्णपदक विजेते किम वूजिन आणि किम जे देओक यांच्याशिवाय ली वू सेओक कोरियन संघाचा तिसरा सदस्य होता.