Thomas and Uber Cup 2024 – इशाराणी बरुआ आणि अनमोल खरब यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला बॅडमिंटन संघाने रविवारी अ गटातील दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा 4-1 असा पराभव करत उबेर करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आशियाई चॅम्पियन भारताने पहिल्या सामन्यात कॅनडाचा 4-1 असा पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने शानदार कामगिरी दाखवली आणि पहिल्या सामन्यात अश्मिता चलिहा हरल्यानंतरही पुनरागमन करत उर्वरित सर्व सामने जिंकले.
अव्वल खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या युवा आणि अननुभवी भारतीय संघासाठी हा आठवडा खूप चांगला होता. खेळाडूंनी मोठ्या मंचावर उत्कृष्ट कौशल्य आणि उत्साह दाखवला आणि पहिले दोन सामने जिंकले. दोन विजयांसह भारत आता अ गटात चीनच्या मागे दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ मंगळवारी अंतिम गट लढतीत आमनेसामने येतील ज्यातून अव्वल स्थान निश्चित होईल.
Anmol ends on a winning note as #TeamIndia comfortably wins the second group stage tie 😎🔥
📸: @badmintonphoto #ThomasUberCupFinals#UberCup#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/xo8LyQA9NB
— BAI Media (@BAI_Media) April 28, 2024
पहिल्या महिला दुहेरी सामन्यात जिओ एन हेंग आणि जिन यू जिया यांच्यावर 21-15, 21-16 असा विजय मिळवून भारतासाठी पुनरागमन केले. इशरानीने दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात इंसिराह खानचा २१-१३, २१-१६ असा पराभव करत भारताची आघाडी दुप्पट केली.
INDW vs BANW 1ST T20I : टीम इंडियाची दमदार कामगिरी, बांगलादेशचा 44 धावांनी केला पराभव…
अनमोलकडून भारताचा विजय निश्चित
सिमरन सिंघी आणि रितिका ठाकर या 64व्या मानांकित जोडीने यी टिंग, एल्सा लाई आणि जॉन मिशेल या जोडीचा 21-8, 21-11 असा पराभव करत भारताला 3-1 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली. यानंतर उदयोन्मुख भारतीय खेळाडू अनमोलने तिसऱ्या एकेरीच्या लढतीत ली जिन मेगनचा २१-१५, २१-१३ असा पराभव करून भारताचा ४-१ असा विजय निश्चित केला. भारताने 1957, 2014 आणि 2016 मध्ये तीनदा उबेर कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.