मैत्रीपूर्ण लढतीमुळे पक्षांची कसरत
कणकवलीमध्ये भाजप शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकल्याने या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सर्वत्र आहे. मात्र, यामध्येही तीच स्थिती आहे. इथेही भाजप- शिवसेनेचे उमेदवार एकमेकाविरूद्ध लढत आहेत. या मैत्रीपूर्ण लढतीत टीका करताना युतीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कसरत करावी लागत आहे.
सातारा – माण मतदारसंघातील तिरंगी लढतीत काय होणार, याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जयकुमार गोरे, शेखर गोरे व प्रभाकर देशमुख या प्रमुख तीन उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू असून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. गोरे यांच्या घरातच आमदराकी राहणार की देशमुखांच्या घरात, या प्रश्नाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदार जयकुमार गोरे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपमधील मोठा गट नाराजीचा सूर आळवत आहे. त्यापैकी डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई या दोन नेत्यांना पक्षविरोधी कारवायांमुळे भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. गोरे याचे बंधू शेखर गोरे यावेळीही शिवसेनेकडून रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मतदारसंघात गेली काही वर्षे सातत्याने जनसंपर्कात राहिलेले माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. आमदारविरोधी सर्वपक्षीय “आमचं ठरलयं’ या आघाडीकडून ते लढा देत आहेत. या तिरंगी लढतीमध्ये काय होणार याची उत्सुकता लोकांमध्ये आहे. कारण जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघात मोठे वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे इतर सर्व पक्ष आणि नेते निष्प्रभ झाल्यासारखी अवस्था काही काळ झाली होती.
जयकुमार गोरे यांच्याविरोधात एकजूट करण्यात काही जणांचे प्रयत्न यशस्वी झाले. त्यासाठी पुढाकार घेणार भाजपचे नेतेच गोरे यांच्या भाजपप्रवेशाने अडणीत आले. मात्र, गेल्या निवडणुकीत चांगली लढत देणारे शेखर गोरे पुन्हा मैदानात उतरले आणि प्रभाकर देशमुखही रिंगणत आले. गोरे बंधुंच्या या लढतीत देशमुख फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजपने पक्षीय पातळीवर गोरे यांच्या विजयासाठी फिल्डिंग लावली आहे.
मुख्यमंत्र्यांची सभाही झाली. गोरे यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासनही मिळाले. त्याशिवाय गोरे यांनी मतदारसंघातील गाव न गावं पिंजून काढले. शेखर गोरे यांनीही शिवसेनेची उमेदवारी मिळवत आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच अटीतटीच्या या लढतीत माणचा कौल कुणाला मिळणार, याकडे सर्वंचे लक्ष आहे.
मैत्रीपूर्ण लढतीमुळे पक्षांची कसरत
कणकवलीमध्ये भाजप शिवसेनेचे उमेदवार एकमेकांसमोर ठाकल्याने या मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा सर्वत्र आहे. मात्र, यामध्येही तीच स्थिती आहे. इथेही भाजप- शिवसेनेचे उमेदवार एकमेकाविरूद्ध लढत आहेत. या मैत्रीपूर्ण लढतीत टीका करताना युतीतील दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कसरत करावी लागत आहे.