खालापूर (वार्ताहर) – खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव बुधवारी (दि. १) मोठ्या उत्साहात अन् दिमाखात साजरा करण्यात आला. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने खंडळा घाट दणाणला.
पहाटे मंदिरात श्रींचा दुग्धाभिषेक, महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते झाला. सकाळी होमहवन बबन खरात यांच्या हस्ते व पूजा विकास मरगळे यांच्या हस्ते संपन्न झाली. 10 वाजता शिळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिळफाटा ते सायमाळ मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी डिजेच्या तालावर ठेका धरत भंडारा उधळण्यात आला.
घाटातच हभप मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन झाले. या वेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष डॉ.सुनील पाटील, दत्तात्रय मसुरकर, लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पंकज पाटील, संदीप पाटील, दिनेश थोरवे, अमोल जाधव, तात्या रिठे, शेकापक्षाचे नेते कैलास गायकवाड, रविंद्र रोकडे, डॉ.प्रवीण पोरवाल यांच्यासह सर्व पक्षाचे नेते खोपोली परिसरातील नागरी व धनगर समाज बांधव उपस्थित होते.
आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. या वेळी समाजातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम व त्यांना भेटवस्तू देण्यात आली. तसेच मान्यवरांचा सत्कार, महाप्रसादासह गजनृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले. सायंकाळी 6 वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे, संस्थापक बबन शेडगे, बबन खरात, बाळासाहेब झोरे, बाळासाहेब आखाडे, दीपक आखाडे, नामदेव हिरवे आदी प्रमुखासह उत्सव कमिटीचे बबन जानकर, रामभाऊ कोकरे, लक्ष्मण बावधाने, बाळासाहेब आखाडे, मारुती शेडगे,
पांडुरंग झोरे, भीमा शिंगाडे, धाऊ आखाडे, राम शेडगे, एकनाथ घाटे, ईश्वर गोरे, बापू बावधाने, विठ्ठल बोडेकर, रामदास जानकर, संतोष गोरे, बाळू शेडगे, भाऊ शेडगे, सुरेश बोडेकर, दत्ता बावदाने व समाज बांधवांनी मेहनत घेतली होती. शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक तथा धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी आभार मानले.