Palghar Lok Sabha Election 2024: पालघरमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट झाला झाला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आदिवासी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे चिरंजीव डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाणे लोकसभा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळविले. मात्र त्याबदल्यात त्यांना महायुतीत पालघरची जागा भाजपला सोडावी लागली आहे.
पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भारती कामडी यांनी उमेदवारी देण्यात करण्यात आली आहे. त्यांनी आज उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यानंतर रात्री उशीरा भाजपच्या वतीने डॉ. हेमंत सावरा यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.