तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – येथील ॲड्.पु वा. परांजपे विद्या मंदिरामध्ये रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सौजन्याने शाळा सुधार विकास प्रकल्पांतर्गत सेन्साटा टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या समाज विकास फंडातून उभारण्यात आलेल्या मुलींचे स्वच्छतागृह व कोनशिला अनावरण करण्यात आले.
या वेळी झालेल्या कार्यक्रमास कॅरेन असदोरियन व्ही.पी, गिर्बिट रोक्स टर्बोंनसन मानव संसाधन संचालक, सतीश बोरोळे संचालक व्यवसाय प्रमुख, योगेश पवार प्रमुख इंडिया टेक सेंटर,चैतन्य कुलकर्णी व्यवस्थापक, अपर्णा दिवेकर एच. आर. मॅनेजर इंडिया, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे उपाध्यक्ष कमलेश कार्ले, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे,
सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, ज्येष्ठ संचालक यादवेंद्र खळदे, श्रीशैल मेंथे, अशोक काळोखे, विश्वनाथ मराठे, महेश महाजन, राजेंद्र पोळ, जयंत देशपांडे, मंगेश गारोळे, राजू गोडबोले, देवेंद्र कदम, प्रभाकर निकम, अतुल हंपे, प्रमोद दाभाडे, अविनाश धेंडे, निलेश वाकचौडे, अरुण सोनवणे, चेतन नामजोशी, धनंजय माथुरे, आनंद असवले उपस्थित होते. प्रास्ताविक पांडुरंग पोटे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काळडोके यांनी केले. आभार कमल ढमढेरे यांनी मानले.