अजय देवगण आपल्या तानाजी चित्रपटात ‘तानाजी’ची अजरामर भूमिका साकारतो आहे. तानाजीच्या तयारी दरम्यान मराठी इतिहासाविषयी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या, असे अजयने म्हटले आहे. अजयने रविवारी ट्विटरवर प्रसाद ओक द्वारा दिग्दर्शित आणखी एक इतिहासावरील मराठी चित्रपट ‘हिरकणी’ चा ट्रेलर शेअर केला.
या व्हिडिओसह त्याने “तानाजी’च्या तयारीबाबत लिहिले. “तानाजी’च्या तयारी दरम्यान मी मराठाच्या इतिहासातील काही विशिष्ट माहिती जाणून घेतली आहे. “हिरकणी’च्या मातृत्वाविषयीही मी ऐकले होते. आता ‘हिरकणी’ चा ट्रेलर शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, असेही अजयने म्हटले आहे.
“तानाजी’ हा एक पिरीएड ड्रामा आहे. त्यामध्ये अजयसोबत काजोलही असणार आहे. या सिनेमातून शिवाजी महाराजांचा विश्वासू सहकारी आणि नरवीर तानाजी मालुसरेची जीवनागाथा, संघर्ष आणि बलिदानाची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
प्रथमच बॉलिवूडमध्ये अशा योद्ध्याबाबत सिनेमा होतो आहे. स्वतः अजय देवगणनेच प्रोड्युस केलेल्या या सिनेमामध्ये तो स्वतःच तानाजीचा रोल साकारतो आहे. त्यामुळे तानाजीच्या रोलला तो नक्की न्याय देईल, यात शंका नाही.