लोणावळा, (वार्ताहर) – प्लॅस्टिक मुक्त लोणावळा शहर करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण कन्ट्रोल बोर्ड, पुणे शाखा व लोणावळा नगरपरिषद यांच्या वतीने शहरात एकल वापर प्लास्टिक बंदीअंतर्गत धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतर्गत सुमारे 50 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रदूषण कन्ट्रोल बोर्ड व लोणावळा नगरपरिषदेच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध आस्थापनात जाऊन बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर कुठे होत आहे याबाबत तपासणी करण्यात आली. जेथे ते आढळून आले तेथे ते जप्त करून दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेत 50 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी तथ मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी बंदी असलेले प्लॅस्टिक दुकानात विक्रीसाठी ठेवू नये तसेच प्लॅस्टिक मुक्त लोणावळा संकल्पासाठी सर्वांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.