नवी दिल्ली – सत्तास्थापनेवरून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देणारे पत्राचा उलगडा झाला आहे.
अजित पवार यांनी राज्यपालांकडे सादर केलेल्या पत्रात राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांची नावे असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रामध्ये अजित पवार यांनी लिहिले की, राज्यात जास्त काळ राष्ट्रपती राजवट राहू नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी सरकार स्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देत आहे. मी राष्ट्रवादीचा गटनेता आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. अजित पवारांच्या मराठीतील पत्राचा अनुवाद तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितला.
NCP-INC-Shiv Sena petition: Solicitor General to Supreme Court – Present position is, Guv has invited the majority alliance in the House to form govt. Devendra Fadnavis staked claim following the letter of Ajit Pawar along with letters of support of 11 independent & other MLAs. pic.twitter.com/CljHMy9Dzk
— ANI (@ANI) November 25, 2019