Congress Party | Sharad Pawar | Devendra Fadnavis | काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे भाकित राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी वर्तवले आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, भविष्यात शरद पवार गटच काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केले असेल. धुळे मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर भामरे यांच्या प्रचारसभेसाठी आज, देवेंद्र फडणवीस धुळ्यात होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
फडणवीस म्हणाले, त्यांना असे म्हणायचे असेल तर त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांच्या डोक्यात असेल की तो काँग्रेसमध्ये विलीन करावा. यापूर्वीही शरद पवार यांनी अनेक वेळा पक्ष तयार केले आणि काँग्रेसमध्ये गेले.
आता त्यांनी हे संकेत दिले आहेत. त्यांचा पक्ष त्यांना चालवणे शक्य होणार नाही. त्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना महायुतीला प्रतिसाद मिळत आहे.
आमच्यासाठी वातावरण अनुकूल आहे. आम्ही आठही जागा चांगल्या फरकाने जिंकणार आहोत. नंदुरबारमध्ये हिना गावित या विक्रमी मताने निवडून येतील. तर धुळ्याला देखील डॉक्टर सुभाष भामरे प्रचंड मतांनी विजयी होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
‘काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील’ – शरद पवार
‘पुढील काही वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी जवळीक साधतील. मला काँग्रेस आणि आमच्यात काही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आपण गांधी आणि नेहरूंच्या विचाराचे आहोत. जरी मी आत्ता काही बोलत नाही. मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही बोलू नये.
वैचारिकदृष्ट्या आम्ही त्यांच्या (काँग्रेस) जवळ आहोत. रणनीती किंवा पुढील पावले यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. मोदी यांना जुळवून घेणे किंवा पचवणे कठीण आहे. तेही ते म्हणाले आहे.मध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी योग्य वाटत असेल तर ते विचारात घेऊ शकतात.” असं शरद पवार यावेळी म्हणाले.