Jairam Ramesh । Sam Pitroda । Congress : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. भारतात पूर्वेकडील लोक चीनसारखे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकेसारखे दिसतात. असे पित्रोदा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
सॅम पित्रोदा म्हणाले, ‘भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. येथे पूर्वेकडील लोक चीनसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक बहुधा गोऱ्यासारखे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात’. असं ते म्हणाले आहेत.
सैम पित्रोदा द्वारा भारत की विविधताओं को जो उपमाएँ दी गई हैं, वह अत्यंत ग़लत व अस्वीकार्य हैं। भारतीय राष्ट्रिय कांग्रेस इन उपमाओं से अपने आप को पूर्ण रूप से अलग करती है।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) May 8, 2024
दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, ‘सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतातलं वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केलीय ते दुर्दैवी आणि स्वीकारण्यासारखं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही’.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले, पाहा….
या प्रकरणावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारे लोक आहोत. मला पित्रोदा यांच्या वक्तव्याचा खूप राग आलाय. संविधानाचं रक्षण करण्याच्या गप्पा मारणारे लोक त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत आहेत.
विरोधकांनी मला शिवीगाळ केल्याने मला फरक पडत नाही. ते मी सहन करू शकतो. परंतु, माझ्या देशातील जनतेला कोणी काही म्हटलं, तर ते मला सहन होणार नाही. कोणाच्याही त्वचेच्या रंगावरून त्याची गुणवत्ता ठरवू शकत नाही.”