IPL 2024 (SRH vs LSG Match 57, Result) : आज आयपीएल 2024 च्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने होते. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा दारूण पराभव केला आहे.
हैदराबादने 62 चेंडू शिल्लक ठेऊन आणि 10 विकेट्स राखून सामना जिंकला. लखनौने प्रथम खेळताना 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादने एकही विकेट न गमावता अवघ्या 9.4 षटकांत 167 धावा करत एकहाती विजय साकारला. ट्रॅव्हिस हेड 30 चेंडूत 89 धावा करून नाबाद परतला. त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 8 षटकार आले. तर अभिषेक शर्मा 28 चेंडूत 75 धावा करून नाबाद परतला. त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. लखनौविरुद्ध हैदराबादचा हा पहिला विजय आहे.
WHAT. A. CHASE 🧡
A 🔟-wicket win for @SunRisers with more than 🔟 overs to spare!
Scorecard ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/kOxzoKUpXK
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्यांच्याकडे 12 सामन्यांत सात विजय आणि पाच पराभवांसह 14 गुण आहेत. हैदराबादचा निव्वळ रन रेट +0.406 आहे. त्याचवेळी, लखनौचा हा 12व्या सामन्यातील सहावा पराभव ठरला. 12 गुण आणि -0.769 च्या निव्वळ धावगतीने संघ सहाव्या स्थानावर आहे.
हैदराबादचे पुढील सामने 16 मे रोजी गुजरात टायटन्स आणि 19 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आहेत. हैदराबाद संघ हे दोन्ही सामने आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्याचवेळी लखनौ संघाचा सामना 14 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली आणि 17 मे रोजी वानखेडेवर मुंबईला होणार आहे.
तत्पूर्वी, लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत चार गडी गमावून 165 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. एकवेळ लखनौने 12 व्या षटकात 66 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर आयुष बडोनी आणि निकोलस पुरन यांनी 52 चेंडूत 99 धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे लखनौला 165 धावसंख्येपर्यंत मजल मारण्यात यश आले.
Innings Break!
A crucial 5️⃣th wicket partnership help #LSG set a target of 1️⃣6️⃣6️⃣ 🎯
Will it be enough for the home side? 🤔
An important second innings next ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/z6ItYC48pd
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
बडोनीने 30 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. त्याचवेळी पुरणने 26 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 48 धावांची नाबाद खेळी केली. पूरन आणि बडोनी यांनी विशेषत: शेवटच्या 5 षटकांमध्ये हैदराबादच्या गोलंदाजांची धुव्वा उडवली. पूरन आणि बडोनी यांनी शेवटच्या 5 षटकात 63 धावा केल्या आणि 99 धावांची भागीदारी करून लखनौला कमी धावसंख्येपर्यंत जाण्यापासून वाचवले. याव्यतिरिक्त लखनौकडून फलंदाजीत केएल राहुलने 33 चेंडूत 29 तर कृणाल पांड्याने 21 चेंडूत 24 धावांची खेळी केली. क्विटंन डी-काॅक केवळ 2 धावा काढून माघारी परतला.
IPL 2024 (DC vs RR Match 56) : पंचांशी हुज्जत घालणे पडलं महागात..! BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई…
हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 12 धावांत 2 बळी घेतले तर पॅट कमिन्सने 4 षटकात 47 धावा देत 1 बळी घेतला. टी नटराजन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात एकही विकेट न घेता 50 धावा दिल्या.