‘आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय’

मुंबई – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हंटले कि, आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शपथविधी आज सायंकाळी होत असून त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार आहेत. या सरकारमध्ये केवळ एकच उपमुख्यमंत्रिपद राहणार असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.