नगर – राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतीचे विभाजन झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे विसर्जन होऊन एकत्रीकरण केले आहे.अशा नव्याने स्थापित व मुदत संपणा-या ग्रामपंचायती संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला ग्रामपंचायतचे नान्नज दुमाला व काकडवाडी, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण ग्रामपंचायतीचे मांडवगण व महांडुळवाडी, तसेच कोकगाव गामपंचायतीचे कोकणगाव व भावडी व पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीचे राळेगण थेरपाळ व म्हसे खुर्द असे विभाजन केले आहे.
विभाजन/ एकत्रीकरणानंतर नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणार-या रिक्त सरपंच पदासह रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांकरिता राबविण्यात येणा-या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 4 डिसेंबर , हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक 4 ते 7 डिसेंबर पर्यत व प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 9 डिसेंबर असा आहे. असे जिल्हाधिकारी, यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.