तेहरान – इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी ( Ayatollah Khamenei ) यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच आता त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. इराणमध्ये सुप्रीम लिडर अर्थात सर्वोच्च नेते हे सगळ्यांत वरचे पद मानले जाते आणि तेच देशात सगळ्यांत शक्तीशाली आहे. अयातुल्ला खोमेनी यांचे वय आता ८५ झाले आहे. १७ एप्रिल रोजी त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता. मात्र त्याच दिवशी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता.
खोमेनी यांच्या प्रकृतीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाच्या प्रमुखाने खोमेनी एकदम फिट असल्याचा निर्वाळा दिला आहे. इराण आणि आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी येथे राहावे यासाठी ईश्वराने त्यांचे आरोग्य असेच चांगले ठेवावे असेही डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, खोमेनी यांचे द्वितीय पुत्र मोजतबा ( Mojtaba Khamenei ) हेच खोमेनी यांचे उत्तराधिकारी म्हणजे इराणचे सुप्रीम लिडर असतील असे सर्वेक्षणात आढळून आले असल्याचे स्टिमसमनच्या बातमीत म्हटले आहे.
तथापि, मोजतबा यांच्या नावावर एकमत नसल्याचाही दावा करण्यात आला आहे. १९७९ च्या इराण क्रांतीचे नेते असलेल्या अयातुल्ला रूहोल्लाह खोमेनी यांनीच मुलाला सत्ता सोपवणे ही अनैतिक राजेशाही असल्याचे म्हटले होते. तर १९८९ मध्ये सुप्रीम लिडर झालेल्या अलि खोमेनी यांनी एकाच घराण्याचे शासन हे इस्लामच्या विपरित असल्याचे म्हटले होते.
Netanyahu on US Threat : गरज पडली तर आम्ही बोटांच्या नखांनीही लढू- नेतान्याहू
विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार इराणचे राष्ट्रपती इब्राहीम रईसी यांचे नावही सुप्रीम लिडर होण्यासाठी चर्चेत आहे. त्यांनी राजकीय व्यवस्थेप्रती आपली अढळ निष्ठा सिध्द केली आहे. १९८८ पासून २०१९ पर्यंत खोमेनी यांनी त्यांची अनेक पदांवर नियुक्ती केली होती. तर काही जणांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम लिडर पदासाठी आवश्यक असे व्यक्तीत्व रईसी यांच्याकडे नाही.
६७ वर्षीय अलिरेजा अराफी यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. इराणच्या सत्ता संरचनेत त्यांनी २००१ पासून आपले योगदान दिले आहे. अलि खोमेनी यांनी त्यांची अनेक महत्वाच्या पदांवसर नियुक्ती केली होती. शुक्रवारच्या नमाजसाठी इमाम म्हणूनही त्यांची निवड केली गेली. हे पद इराणच्या धार्मिक क्षेत्रातील सर्वोच्च पद आहे.