बिजापूर – छत्तीसगढमधील चकमकीत शुक्रवारी सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ती घटना बिजापूर जिल्ह्यातील जंगलात घडली. त्या राज्यात चालू वर्षी सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात अनेक धडक मोहिमा राबवल्या. त्यामध्ये आतापर्यंत १०३ नक्षली ठार झाले.
ताज्या घटनेत एका गावाजवळील जंगलात जोरदार चकमक झडली. चकमक थांबल्यानंतर १२ नक्षलींचे मृतदेह आढळले. त्या यशस्वी मोहिमेबद्दल छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले. छत्तीसगढमध्ये महिनाभरापेक्षा कमी कालावधीत नक्षलींना जबर हादरा देणाऱ्या ४ चकमकी झडल्या. कांकेर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीला २९ नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर ३० एप्रिलला कांकेर आणि नारायणपूर जिल्ह्यांतील चकमकींमध्ये १० नक्षली ठार झाले.