नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाकडून आज अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाल्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाईला आणि अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 13 मे रोजी सुनावणी होणार आहे.
झारखंड हायकोर्टाने 3 मे रोजी झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांची याचिका फेटाळली होती. यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांनाही सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.