मुंबई – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असल्याने राज्यभरात शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आले असून दादरचा परिसर भगवामय झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हाऊ इज जोश? जय महाराष्ट्र, असे ट्विट केले आहे.
How is Josh?
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2019
दरम्यान, शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीसोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून खबरदारीचा उपाय म्हणून शिवतीर्थावरील जागेचा पोलिसांनी ताबा घेतला आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील 400 शेतकऱ्यांना तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.