कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाउन तुम्हाला खूप मोठा वाटतोय का? मात्र आम्ही या 21 दिवसात घरी असतो तर काय केले असते तुम्हाला पहायचेय का?, असे म्हणत मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. लॉकडाउनच्या काळात ‘ऑन ड्युटी’ असणार्या पोलिसांनी 21 दिवसात काय केले असते यासंदर्भातील आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार फिदा झाले आहेत. अनेकांनी ट्विट करुन मुंबई पोलिसच खरे सुपर हिरो असल्याचे सांगत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारी तर मुंबईकर आहेत, आम्ही फक्त मुंबईला पुन्हा एकदा ‘झकास’ बनवण्याचं ‘मिशन पॉसिबल’ करण्याचा प्रयत्न करतोय. https://t.co/4HUhideaZv
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 9, 2020
दरम्यान, सेलिब्रिटींनीपोलिसांच्या कामाची दखल घेऊन त्यांना जाहीर धन्यवाद द्यायला सुरुवात केलीय आणि पोलीस अत्यंत विनम्रपणे त्याचा स्वीकार करतायत. अभिनेत्री सई ताम्हणकरने मुंबई पोलिसांना “जगात भारी’ म्हटलं तेव्हा “भारी तर मुंबईकर आहेत. आम्ही फक्त मुंबईला पुन्हा एकदा झकास बनवण्याचं मिशन पॉसिबल करण्याचा प्रयत्न करतोय,’ असा प्रतिसाद पोलिसांकडून मिळाला. अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन आदी सगळेच सेलिब्रिटी पोलिसांची पाठ थोपटतायत आणि पोलीस म्हणतायत, “इट्स माय प्लेजर’!
Dear Mumbai Police, you are known as one of the BEST in the world. Your contribution to the COVID-19 pandemic is unparalleled. Singham will wear his Khakee and stand beside you whenever you ask. Jai Hind, Jai Maharashtra 🙏@CPMumbaiPolice @MumbaiPolice
— Ajay Devgn (@ajaydevgn) April 9, 2020
अभिनेता अजय देवगणने पोलिसांना धन्यवाद देणारा व्हिडिओ शेअर केला, तेव्हा पोलिसांनी क्रिएटीव्हिटी दाखवत त्याच्याच चित्रपटांची नावं घेऊन उत्तर दिलं- प्रिय “सिंघम’, “खाकी’ने या परिस्थितीत जे करायला हवं, तेच आम्ही करतोय. परिस्थिती सुरळीत व्हायला हवी. “वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’! खरं तर अडचणीत सापडलेल्यांना मदत करणारे पोलीस आपण अनेकदा “पाहतो’; पण दे “दिसत’ नाहीत. सध्याच्या संकटानं खूप उंचीवर नेऊन ठेवलेलं पोलीस-नागरिक नातं अबाधित राहो! या व्हिडिओच्या ट्विटला रिट्विट करत अनेक कलाकारांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. आम्ही सदैव तुमच्या ऋणात राहू, तुमच्याबद्दलचा आदर शब्दात व्यक्त करता येणार नाही, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया कलाकारांनी नोंदवल्या आहेत.