Philippines US Military Drills | अमेरिका-फिलीपाईन्समध्ये क्षेपणास्त्रांसह युद्धसराव, चीनला थेट इशारा…

इटबायात – अमेरिका आणि फिलीपाईन्सच्या नौदलांमध्ये तैवानच्या दक्षिणेकडील समुद्रधुनीमधील बाशी खाडीमध्ये सोमवारी सशस्त्र युद्धसराव करण्यात आला. चीन आणि फिलीपाईन्समधील वाढत्या सागरी तणावाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेच्या नौदलाकडून चीनला थेट इशारा देण्यासाठी हा युद्धसराव आयोजित केला गेला होता. या युद्धसरावादरम्यान अमेरिकेच्या नौदलाच्यावतीने हिमार्स क्षेपणास्त्रांचा वापर केला गेला. तर फिलीपाईन्सची ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरही या सरावामध्ये सहभागी झाली होती.
बटानेस प्रांतातील इटबायात हा वार्षिक लष्करी सरावाचा एक भाग आहे. हा सराव गेल्या महिन्यात सुरू झाला होता आणि त्याला बालिकाटन असे नाव दिले गेले आहे. अमेरिका आणि फिलीपाईन्सचे मिळून १६ हजार नौदल कर्मचारी या युद्धसरावामध्ये सहभागी झाले होते. या वर्षीच्या सरावामध्ये प्रथमच क्षेपणास्त्रांचा थेट वापर केला गेला होता.
जपान आणि युरोपातल्या अनेक मित्र देश आणि सुरक्षा भागीदार राष्ट्रांच्या निरीक्षकांसह फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन सैन्याचे देखील २५० हून अधिक सैनिक सोमवारी झालेल्या या सरावामध्ये सहभागी झाले होते.
Taliban reject Pakistan’s claim : पाक लष्कराचा ‘तो’ दावा तालिबानने फेटाळला….
दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनची आक्रमकता अलिकडच्या काळात खूप वाढली आहे. गेल्या वर्षापासून चीनच्या जहाजांनी फिलीपाईन्सच्या नौकांना पिटाळून लावले होते. अशा घटना वारंवार घडायला लागल्या होत्या. मात्र हा युद्धसराव चीनला इशारा देण्यासाठी केला गेला नव्हता, असे अमेरिका आणि फिलीपाईन्सने म्हटले आहे.





